दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये छ. शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी…
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालीत दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये २६ जुन २०२१ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी छ. शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले आणि त्यांचा प्रेरणा दायी जीवनपट उपस्थितांना सांगितला.
याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.