जागतिक पशुजन्य रोग दिना निमित्त ऑनलाईन पोस्टर मेकींग स्पर्धा संपन्न.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये ६ जुलै २०२१ रोजी कॉलेजमध्ये ‘जागतिक पशुजन्य रोग दिनाचे’ औचित्य साधुन सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत ऑनलाईन पोस्टर मेकींग स्पर्धा घेण्यात आली. एकुण २५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला.
सर्वात सुंदर पोस्टर तयार करुन तृप्ती मोरे – प्रथम क्रमांक, रिफत रखांगे – द्वितीय क्रमांक, तन्वी गुरव – तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक मिळविला. तसेच सफा हसबा या विद्यार्थीनीस उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाने सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रियांका साळवी आणि सहाय्यक प्रा. अक्सा करेल यांनी विशेष मेहेनत घेतली.