दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये मान्सुन क्रिडा स्पर्धा उत्साहात साजऱ्या..
दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये नुकत्याच २३ व २४ ऑगस्ट रोजी मान्सुन क्रिडा
स्पर्धा उत्साहात पार पडल्या. महाविद्यालयातील उत्तनोत्तम खेळाडु निवडुन त्यांना आंतर महाविद्यालयीन
स्पर्धेसाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन देणे , हा मान्सुन क्रिडा स्पर्धेचा मुख्य हेतु आहे. या क्रिडा स्पर्धेत कबड्डी ,
खोखो , व्हॉलीबॉल टग ऑफ वॉर , फुटबॉल या क्रिडा प्रकारांचा समावेश होतो.
मान्सुन क्रिडा स्पर्धेचे उदघाटन २३ ऑगस्ट रोजी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते झाले.
प्रथम टप्प्यात मुलांच्या गटात कबड्डीचा सामना रंगला त्यात महाविद्यालयीन गट प्रथम व F.Y. BCOM चा गट
द्वितीय आला.
त्यानंतर खोखो स्पर्धा S.Y.BSC. व T.Y.BSC मध्ये झाली ज्यामध्ये SYBSC च्या मुलांनी बाजी मारली.
व्हॉलीबॉल सामन्यात FYBCOM संघ प्रथम , TYBCOM संघ द्वितीय आला. अशाच प्रकारे
टग ऑफ वॉर या सामन्यात FYBCOM संघ प्रथम FYBSC चे विद्यार्थी द्वितीय आले.
अंतिम फुटबॉल सामन्यात FYBSC विरुद्ध महाविद्यालयीन संघाने बाजी मारली.
द्वितीय टप्प्यात मुलींच्या गटात कबड्डी , खोखो ,
टग ऑफ वॉरहे तीन सामने झाले.
ज्यामध्ये कबड्डीत TYBSC विरूध्द महाविद्यालयीन संघ विजयी झाला.
खोखो या क्रिडा प्रकारात TYBSC विजयी होउन
महाविद्यालयीन संघ द्वितीय आला.
टग ऑफ वॉरच्या अंतिम सामन्यात महाविद्यालयीन संघाने चुरशीची लढत देऊनही TY.BSC (B) घट विजयी
ठरला.
यावेळी समन्वयक म्हणून प्रा. संतोष मराठे व पंच म्हणून महाविद्यालयाच्या क्रिडा प्रमुख प्रा. वर्षा धामणे यांनी
कार्य केले. विजयी व उपविजयी संघातील विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी अभिनंदन केले असुन
अंतिमत: विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे त्यांनी कौतुक केले. या क्रिडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. विक्रम मासाळ ,
प्रा. नंदा जगताप , प्रा गायत्री सराफ , प्रा. अनिकेत नांदिसकर , प्रा . नेहा खेडेकर या शिक्षक वर्गाने महत्त्वपुर्ण
कार्य केले.