‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ‘ या विषयावर उद्बोधक कार्यशाळा संपन्न
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ आणि दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील iqac विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ‘ या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस दापोली एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी भाई उपाले ( संघटनमंत्री, विद्याभारती, महाराष्ट्र प्रांत) यांची या कार्याशाळेसाठी प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. या कार्यशाळे मधुन तीस वर्षानंतर बदललेल्या शैक्षणिक धोरणाची सखोल व विस्तृत माहिती भाई उपाले यांनी उपस्थितांना दिली.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामधून बदललेले शैक्षणिक सूत्र, बहुभाषिक शिक्षण, प्रादेशिक भाषांचा शिक्षणात वापर, विविध कौशल्यांचा शिक्षण शिकवण्यात अंतर्भाव, बारावीच्या वर्गाला असणारी बोर्डाची परीक्षा, तसेच संशोधन करणाऱ्यांना पदवी अधिक एक वर्षाचा मास्टर अभ्यासक्रम पुरेसा असणार आहे या बाबतही त्यांनी सखोल चर्चा केली.
सेच उच्च शिक्षणआता एकाच छताखाली येणार, विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तके बदलणार, शिक्षकां सोबत विद्यार्थीदेखील स्वतःचे मूल्यांकन करणार, सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश प्रक्रिया, शिक्षणातील गुंतवणूक जीडीपी च्या सहा टक्के करण्यात येणार इ. बदललेल्या धोरणांबाबतही त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांचे विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक सिद्राम माळी यांनी केलेअसून कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी संस्थाचालक श्री.सौरभ बोडस यांनी उपस्थितांचे आभार मानले.