दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात संपन्न…!
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये दि. १२ जानेवारी २०२२ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे ‘ राजमाताजिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. घन:श्याम साठे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.या प्रसंगी प्रा. सिद्धी साळगावकरआणि प्रा. रेश्मा देवरुखकर यांनी आपल्या ओघवत्या भाषणशैलीत राजमाता जिजाबाई यांच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक व्यक्ती मत्वाची ओळख उपस्थितांना करुन दिली.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुजीत टेमकर यांनी केले.