भौतिकशास्त्र विभागाने प्रस्तुत केले चांद्रयान – 2
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विभागाने ७३ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चांद्रयान – २ या इस्रोच्या मोहिमेवर माहितीपट सादर केला. 22 जुलै 2019 रोजी इस्रोने चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करून आपल्या सर्व भारतीय नागरिकांची मान गर्वाने उंचावली. या महत्त्वपूर्ण कामगिरीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी 15 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा माहितीपट प्रात्यक्षिकांद्वारे तसेच विविध चित्रफिती दाखवून सादर करण्यात आला. या माहितीपटामध्ये इस्रोचा इतिहास , चांद्रयान – २ मध्ये वापरलेल्या उपकरणांची माहिती , रितु करिगल व वनिता मुथय्या या दोन महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या महिलांच्या कार्याची माहिती , चांद्रयान – २ मधील ऑर्बिटर , रोवर , लँडर या तीन विशेष घटकांची माहिती , चांद्रयान – २ ची वैशिष्ट्ये व त्याच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची विशेषता इ. विषय मांडण्यात आले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून माहितीपटात द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीची माहिती झाली.
” विज्ञान के क्षेत्र मै भारत उडान लेने के लिए तयार है ” ही माननीय श्री. अटल बिहारी वाजपेयी यांची पहिली वहिली उद्बोधक वाक्ये खरी ठरली , असे म्हणता येईल.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या प्रोत्साहनाने यशस्वी प्रयत्न केले.