प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र , दापोली तर्फे दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये राखी पौर्णिमा साजरी…
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये नुकतीच राखी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र , दापोली येथील सदस्या सारिका दीदी व श्रध्दा दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र वैश्विक शांतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते. या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने
उपस्थित महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास सारिका दीदी यांनी ध्यानधारणा , राखीपौर्णिमेचे
महत्त्व समजावुन सांगितले आणि राखीचे बंधन बांधुन प्रत्येकाने स्वत :तील एक अवगुण दुर करावा , असे आव्हान
केले.
या कार्यक्रमाच्या यशवीतेसाठी शिक्षक – विद्यार्थी कल्याण मंडळाच्या समिती अध्यक्ष प्रा. नंदा जगताप व त्यांचे साहाय्यक
प्रा. सुजित टेमकर , प्रा. दिपाली दिवाण यांनी यशस्वी प्रयत्न केले. या कार्यक्रमाची सांगता मिठाई वाटपाने झाली.