दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेजची युवा महोत्सवात बाजी..
मुंबई विद्यापीठाच्या 56 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेजने 8 नामांकने प्राप्त करून विभागीय जनरल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
मांडकी-पालवण येथील तानाजीराव चोरगे सिनियर आर्टस् व कॉमर्स कॉलेज येथे पार पडलेल्या स्पर्धेत महाविद्यालयाने साहित्य स्पर्धा प्रकारात आपला दबदबा कायम ठेवत 6 पैकी 5 स्पर्धा प्रकारात पारितोषिक मिळविले. आयशा खोत हिने सलग दुसऱ्या वर्षी इंग्रजी वक्तृत्वात प्रथम क्रमांक तसेच लमीस तिसेकर हिच्या साथीने इंग्रजी वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. नियती भळगट हिने मराठी कथाकथन तर श्रुती साखळकर-रसिका ओक या जोडीने मराठी वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. रसिका बर्वे हिला इंग्रजी कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. याचबरोबर स्किट स्पर्धाप्रकारात महाविद्यालयाने प्रथेप्रमाणे पारितोषिक पटकावले. नियती भळगट, सुजल जैन, शुभम लोवरे, श्वेता मुलुख,जान्हवी हेदुकर,सिमरन देवघरकर या संघाला व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले. मेहेंदी स्पर्धेत तनाझ मुरुडकर हिला द्वितीय तर ऑन द स्पॉट पेंटिंग मध्ये आकांक्षा अस्वले हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष मराठे, प्रा.कैलास गांधी, नाट्यविभाग समन्वयक प्रा.अजिंक्य मुलूख, साहित्य समन्वयक प्रा. तेजस मेहता व प्रा. ऋजुता जोशी, कला समन्वयक प्रा. प्रियांका साळवी, तसेच सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी प्रा.अनिरुद्ध सुतार, प्रा. विश्वेश जोशी,प्रा.स्वाती देपोलकर, प्रा. सिद्धी साळगावकर, माजी विद्यार्थी जयवंत काटकर, श्रेयस मेहेंदळे यांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्त संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.