दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले ‘पौगंडावस्था व्यवस्थापन मार्गदर्शन ‘
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील महिला विकास कक्षातर्फे दिनांक २ ऑगस्ट, २०२३ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘ पौगंडावस्था व्यवस्थापन मार्गदर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पौगंडावस्थेतील मुलांना व मुलींना मोठे होताना पडणाऱ्या प्रश्नांवर या प्रसंगी चर्चा करण्यात आली. बदलणाऱ्या काळातील नवीन आव्हानांना तोंड देताना या विषयाचे महत्व व्याख्यात्या प्रा. ऋजुता जोशी यांनी विशद केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेल्या विविध शंकांचे समाधान करताना विद्यार्थ्यांच्या बदलणाऱ्या शारीरिक व मानसिक अवस्थांबद्दल चर्चा करण्यात आली. व्याख्यानादरम्यान समाजात वावरताना विद्यार्थ्यांनी स्वतःचे चुकीच्या चालीरीती, स्पर्श आणि घडणाऱ्या गुन्ह्यांपासून कसे रक्षण करावे, याबद्दल विस्तृत संघ-चर्चा घडवून आणली गेली. स्त्री-पुरुष समानता जपताना, प्रत्येकाने समोरच्या व्यक्तीच्या मानवी अधिकारांचेही जतन केलेच पाहिजे, असा संकल्प करून या व्याख्यानाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिद्धी साळगांवकर यांनी केले आणि व्याख्यानाचा शेवट प्रा. रोहिणी गीते यांनी आभारप्रदर्शनाने केला. या कार्यक्रमाकरिता महिला विकासविकास कक्षाच्या प्रमुख प्रा. ज्योती चौगले, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांचे मार्गदर्शन लाभले.