दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील ‘निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर ‘
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटीसंचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये ऊर्जा संरक्षण दिनाचे औचित्य साधून निसर्ग मंडळस मितीमार्फत विद्यार्थ्यांमध्येनिबंधस्पर्धेचेआयोजनकरण्यातआलेहोते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास, अक्षय ऊर्जा स्त्रोत, टंचाईचा कोळसा जळणार कधी ?, कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती इ. पर्यावरणाशी संबंधित विषय देण्यात आले होते.या स्पर्धेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सिंधुदुर्ग,महाड, सावंतवाडी, मुंबई व दापोली अशा विविध ठिकाणांहुन विद्यार्थी सहभागी झाले.
सदर स्पर्धे मध्ये संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ येथील शेफाली कशाळीकर या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच जी.एम.कॉलेज ऑफ सायन्स, तळा येथील अक्षता यादव हिने द्वितीय आणि दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील समीर राजपुरे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश जगदाळे यांनी स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून निसर्ग मंडळ समितीच्या प्रमुख प्रा. नंदा जगताप व सहाय्यक प्रा. स्वाती देपोलकर यांनी या स्पर्धेच्या यशस्विते साठी विशेष मेहनत घेतली.