दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात संपन्न…!
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालया मध्ये दि. २३जानेवारी २०२२ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ‘ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले IQAC विभागाचे समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी क्रिडा विभाग प्रमुख वर्षा धामणे यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीत नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरक व्यक्तीमत्वाची ओळख उपस्थितांना करुन दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुजीत टेमकर यांनी केले.