दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजचा पूरग्रस्तांना मदतीचा हात..
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सेनियर सायन्स कॉलेजने पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या चिपळूण आणि महाडमधील आपद्ग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाड येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दापोलीतून २० लिटर पाण्याचे ७५ जार (१५०० लिटर) यांचा पुरवठा महाडमधील आजी व माजी विद्यार्थ्यांच्या घरी, तसेच बिरवाडी, सरेकर आळी, काकर तळे, शिवाजी चौक येथील अंदाजे ६७ कुटुंबांना करण्यात आला. सदर पाणी वाहतूक आणि पाणी वाटप महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. शंतनु कदम, प्रा. स्वप्नील साळवी, प्रा. अनिकेत नांदिस्कर व महाडमधील माजी विद्यार्थी सिद्धेश हळदणकर, राजेश चौधरी, सुयोग पाटील यांनी केले. तसेच 27 जुलै रोजी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी चिपळूण येथे मदतीसाठी जाऊन येथील दवाखाना गोडाऊन इत्यादी नागरी स्थळे तसेच घरांमध्ये स्वच्छता करण्याचे व तेथील चिखल दूर करण्याचे काम केले. चिपळूण येथील मदत कार्य प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. शंतनु कदम, प्रा. स्वप्नील साळवी, प्रा. अनिकेत नांदिस्कर, डॉ. विक्रम मासाळ, प्रा. सदानंद डोंगरे यांनी पार पाडले.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, डॉ. घनश्याम साठे, प्रा. संतोष मराठे, डॉ. राजेंद्र मोरे व माजी विद्यार्थी पूनम पतिंगे यांनी मेहनत घेतली.