दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये ‘ क्रांती सिंह नाना पाटील’ यांची जयंती संपन्न.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये ‘ क्रांती सिंह नाना पाटील’ यांची जयंती कॉलेजच्या ग्रंथालयात संपन्न झाली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ . सदेश जगदाळे यांनी क्रांती सिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.