दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये रंगली न्यायालयातील ‘मॉक ट्रायल’!
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे, न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ‘मॉक ट्रायल’ चे प्रात्यक्षिक घडवले. प्राध्यापकांनी नेमून दिलेला खटला लढवताना महाविद्यालयातील B.M.S. (बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडी) च्या विद्यार्थ्यांनी वकील, वैद्यकीय अधिकारी, साक्षीदार, इत्यादी विविध भूमिका पार पाडल्या. आपल्या बाजूला न्याय मिळावा, यासाठी या विद्यार्थ्यांनी पुरावे, साक्षी आणि उलटतपासणीच्या जोरावर आपली बाजू सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांना भारताची न्यायव्यवस्था, सामाजिक न्याय आणि विविध कायदे व तरतुदींची माहिती व त्याचबरोबर खऱ्या न्यायालयांचे कामकाज कसे चालते याचे प्रशिक्षणही मिळावे, असा या उपक्रमामागील उद्देश होता.
या उपक्रमामध्ये रसिका ओक, संजना देवळेकर, नुपूर बोधे, तहजेबा महालदार, तलहा झांजू, साहिल जाधव, यश शिगवण, सोबिया हवा, सानिका जाधव, आलिया बालाभाई, अदिती भेकरे, अनिकेत फडखळे, जुहेब जुळे या विद्यार्थ्यांनी आपला उत्साही सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमाचे आयोजन कॉमर्स विभागप्रमुख प्रा. ज्योती चौगले, प्रा. ऋजुता जोशी, प्रा.सिद्धी साळगावकर, प्रा. श्रद्धा खुपटे, प्रा. ऋचा दळवी, प्रा. रोहिणी गीते व प्रा.भाग्यश्री राजपूरकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.