गुरुवंदन – A Gurupornima Programme
आज दिनांक 19 जुलै 2019 रोजी जायंट्स ग्रुप आणि दापोली अर्बन बँके ने सायन्स कॉलेज मध्ये गुरुवंदन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी ‘ जायंट्सग्रुप’ या आंतरराष्ट्रीय समाज सेवी संस्थेचे दापोली मधील अध्यक्ष श्री सुदेश मालवणकर तसेच उपाध्यक्ष निषात सरगुरो, श्रेयस काकिर्डे , माणिक दाभोळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळा अंतर्गत गुरुवंदनाचा कार्यक्रम पार पडला ज्या मध्ये निशिकांत जोशी, अक्षदा सातवीलकर, अमृता राहणे इत्यादी व्यक्त विद्यार्थ्यांनी शिक्षकां विषयी आपले ऋणनिर्देशक केले. या प्रसंगी अध्यक्ष श्री सुदेश मालवणकर यांनी – ‘ शिष्यात स्वसंवेदना जागृत करून त्याला त्याच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा व्यक्ती म्हणजे गुरू’ अशा अत्यंत समर्पक शब्दात गुरुची महती विशद केली. या प्रसंगी निसर्ग मंडळा अंतर्गत महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचा हेतू वृक्षांनाही गुरु मानून त्यांचे जतन केले पाहिजे , ही विचार धारणा सर्वां मध्ये रुजावी असा होता. तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा प्राचार्यांनी घेतला. तसेच या कार्यक्रमात सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन गुरु म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली दिवाण यांनी केले असून प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेज आणि GIANTS ग्रूप दापोली तर्फे गुरुवंदन हा कार्यक्रम केला गेला, त्याची काही क्षण चित्रे.