दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात 6 एप्रिल रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात शनिवारी 6 एप्रिल 2024 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता पदवी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर महाविद्यालयातून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रमाणपत्र दिली जातील. या कार्यक्रमासाठी कोकण विभागाच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे आणि मुंबईच्या चेतना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय जगताप हे पाहुणे म्हणून लाभले आहेत. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. डी. डी. कुलकर्णी यांनी केले आहे.