दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये वाणिज्य, बी. एम. एस. आणि एम. कॉम. मधील नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत-समारंभ उत्साहात साजरा.
दिनांक १६ सप्टेंबर रोजी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये वाणिज्य, बी. एम. एस. आणि एम. कॉम. या वर्षांत नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कॉलेजच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या वर्षी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज या महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या बी. एम. एस. व एम. कॉम. या नव्या शैक्षणिक कोर्सेसची सुरुवात झाली असल्यामुळे या स्वागत-समारंभाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेक पठाण व मुस्कान पटेल या विद्यार्थिनींनी केले. प्रथम वर्ष – वाणिज्य, बी. एम. एस. आणि एम. कॉमच्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घन:श्याम साठे, वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा. ज्योती चोगले, तसेच प्रा. श्रद्धा खूपटे, प्रा. ऋजुता जोशी, प्रा. सिद्धी साळगांवकर व प्रा. ऋचा दळवी या शिक्षकांची उपस्थिती होती. वरिष्ठ वर्गातील नियती बळकट व अंबर जोशी या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नव्याने महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात रसिका ओक व तझीन बुरोंडकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. ऋजुता जोशी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनानंतर औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला. व्यासपीठावरील कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले व त्यांना अल्पोपहार देऊन स्वागत-समारंभाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या नियोजन समितीने विशेष मेहनत घेतली.