दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मार्फत ‘ स्वच्छ सागर तट अभियान ‘ कार्यक्रमाचे आयोजन..
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 17 सप्टे. 2022 रोजी ‘ स्वच्छ सागर तट अभियान ‘ अंतर्गत दापोली तालुक्यातील सालदुरे आणि पाळंदे समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे एकूण 53 स्वयंसेवक, सालदुरे आणि पाळंदे गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या स्वच्छता कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे, प्रा. अजिंक्य मुलुख यांनी केले. हा कार्यक्रम सालदुरे- मुरुड ग्रुप ग्रामपंचायत आणि हर्णे – पाळंदे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने घेण्यात आला. या स्वच्छता उपक्रमात सरपंच कल्पेश कडू यांच्यासोबत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी स्वतः या स्वच्छता कार्यक्रमास सुरुवात केली. सर्वांनी मिळून सालदुरे -पाळंदे किनारपट्टीचा जवळपास 4 किलोमीटर परिसरात स्वच्छ केला
सागर किनारे स्वच्छ आणि पर्यावरण स्नेही राहावेत यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्रा. विश्वेश जोशी, प्रा. अनिरुद्ध सुतार, प्रा. निशिगंधा बंदरकर, प्रा. नेत्रांजली महाडिक, विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल हांडे, सानिका डोळस, निशांत तासकर यांनी विशेष मेहेनत घेतली.