निर्माल्य ट्रस्ट आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांस वाहन वाटप..
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. २२ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात दापोलीतील दिव्यांगांस वाहन वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण पाटील (D.Y.S.P. ता. खेड ) यांची उपस्थिती असेल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दापोली एजुकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. प्रसाद करमरकर भुषवतील. २००५ सालापासुन कार्यरत असणारा निर्माल्य ट्रस्ट दिव्यांगांस विविध कला , कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहे. दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या हेतुने हा ट्रस्ट दापोलीत गेले १० वर्षे कार्यरत आहे. महाविद्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात दिव्यांगांस ३ चाकी स्कुटरचे वाटप करण्यात येईल. जेणे करुन त्यांना कोठे ही जाणे व येणे सुलभ होईल. निर्माल्य ट्रस्टच्या संस्थापक व विश्वस्त सौ. मीना बेदरकर या स्वत: कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास दापोलीतील दिव्यांगांची उपस्थिती प्रार्थनिय आहे , असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी केले आहे.