दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये “बहर ” भित्तीपत्रकाचे अनावरण..
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये मराठी वाड्मय मंडळ व बहर या वार्षिकांक समिती तर्फे ” बहर “या भित्तीत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकी बहर भित्तीपत्रक या एका उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन गुण , कल्पनाशक्ती , चित्रकला , रेखा चित्र या गुणांना प्रसिद्धी मिळणार आहे. दर पंधरा दिवसांनी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या भित्ती पत्रकाच्या कामामुळे कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषय मांडता येणार आहेत.
या प्रथम प्रकाशित अंकामध्ये ग्लोबलायझेशन म्हणजे काय ? , सुसंस्कार काळाची गरज , इ. विषय घेऊन केतकी वैद्य , प्रणाली कान्हेकर , निशिकांत जोशी या विद्यार्थ्यांनी लेख तसेच यामध्ये मुस्कान चिपळूणकर , अल्फिया रखांगे या विद्यार्थ्यांनी त्यांची तैलचित्रे प्रदर्शित केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी या उपक्रमात जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा , अशी इच्छा व्यक्त केली. तसेच अनावरण प्रसंगी उपप्राचार्य डॉ. घन:श्याम साठे , बहर भित्तीपत्रक प्रमुख श्रीमती किर्ती परचुरे , वाड्मय मंडळ प्रमुख प्रा. मुग्धा कर्वे , अभ्यासेतर उपक्रम प्रमुख प्रा. संतोष मराठे , गुणवत्ता विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ घालमे , प्रा. कैलास गांधी व इतर अनेक विद्यार्थी उपस्थित होते.