‘ प्रयोगशाळा आदर्श कार्यपद्धती आणि सुरक्षितता ‘ या विषयावर उद्बोधक वेबिनार संपन्न….
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी
‘ प्रयोगशाळा आदर्श कार्यपद्धती आणि सुरक्षितता ( Good Laboratory Practices And safety Practices) ‘ या विषयावर ऑनलाईन वेबिनार दि. ०७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२. ३० या वेळेत आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत IQAC COORDINATOR डॉ. रघुनाथ घालमे यांनी केले असुन वेबिनारचे समन्वयक प्रा. संतोष मराठे यांनी प्रमुख व्याख्याते – सहाय्यक प्रा. डॉ. प्रल्हाद रेगे ( सेंट झेव्हियर्स कॉलेज, मुंबई ) यांची उपस्थितांना ओळख करुन दिली.
सदर वेबिनारमध्ये व्याख्याते डॉ. प्रल्हाद रेगे यांनी ओघवत्या शैलीत ‘ प्रयोगशाळा आदर्श कार्यपद्धती, प्रयोगशाळेत घ्यायची काळजी, स्वसंरक्षण, PPE किटचा उत्तम वापर या विषयी विद्यार्थ्यांशी सखोल संवाद साधला. तसेच आपल्या व्याख्यानातून त्यांनी काही सुरक्ष पद्धतीबाबत स्व अवगत असले पाहिजे जसे की , ‘ MSDS म्हणजे काय ? त्यातून आपल्याला कोणती माहिती मिळते ? ; SOP म्हणजे काय ? ‘ इ. उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल समजावून सांगितल्या.
व्याख्याना नंतर डॉ. प्रल्हाद रेगे यांनी रसायनांमुळे घडणाऱ्या दुर्घटना आणि त्याप्रसंगी बाळगायची सावधगिरी या संदर्भात काही व्हिडीओ ही दाखविले.
या वेबिनारला एकुण १०० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपला उत्सफुर्त सहभाग दर्शविला. वेबिनारच्या समारोप प्रसंगी डॉ. गंगा गोरे यांनी कॉलेजतर्फे आभार प्रदर्शित केले. तसेच या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी प्रा. शंतनु कदम यांनी तांत्रिक सहकार्य केले .