दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजच्या क्रिडांगणावर रंगला ‘ क्रिकेट प्रेक्षणीय सामना ‘
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजच्या क्रिडांगणावर २४ डिसेंबर २०२१ रोजी ‘ विद्यार्थी विरुद्ध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘ क्रिकेट प्रेक्षणीय सामना खेळण्यात आला. या सामन्यासाठी एकूण ४१ विद्यार्थी व एकूण १८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग दर्शविला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून पहिला फलंदाजीचा मान मिळवला. या दिवशी एकूण ४ सामने खेळ विण्यात आले.
पाच षटकांच्या खेळी मध्ये ५८ धावसंख्या करत अंतत: विद्यार्थ्यांच्या ‘अ ‘ संघाने, ‘ ब ‘संघावर अठरा धावांनी विजय मिळवला.
हा क्रिकेट प्रेक्षणीय सामाना उत्कृष्टरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे,
उप प्राचार्य डॉ. घनश्याम साठे,
प्रा. अनिकेत नांदिस्कर,सुजीत पवार, प्रा.नंदा जगताप, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. सिद्धी साळगावकर, प्रा. प्रिती बोरसे, प्रा. दिपाली नागवेकरआणि शिक्षकेतर कर्मचारी महेश चव्हाण व सुशांत जाधव यांनी विशेषमेहेनत घेतली.