दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये – ‘लालबहादुर शास्त्री ‘ व ‘ महात्मा गांधी ‘ जयंती संपन्न
दि. ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील ग्रंथालयात डि.एल. एल.ई व राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) यांच्या सयुक्त विद्यमाने ‘ लालबहादुर शास्त्री ‘ व ‘ महात्मा गांधी ‘ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पुजन केले. प्रा. कैलास गांधी व प्रा. संतोष मराठे यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीत या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वास उजाळा दिला. तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधीजींनी अनुसरलेल्या सदभावना, सदाचार, सत्य व अहिंसेची मुल्ये समाजात पुन्हा स्थापित करण्याची प्रतिज्ञा केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुजीत टेमकर यांनी केले.