दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या अली बांगीचे सुयश.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य चा विद्यार्थी कु. अली दाऊद बांगी याने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन व आर्टस् आणि विज्ञान महाविद्यालय सावर्डे आयोजित घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत आपला ठसा उमटवला. अली बांगीची कोकण झोन च्या व्हॉलीबॉल संघामध्ये निवड झाली आहे. आता आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अली कोकण झोनचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
त्याचबरोबर पुढील आंतर विभागीय स्पर्धा दि. 7 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2023 रोजी बी. के. बिर्ला कॉलेज कल्याण येथे पार पडणार आहेत.
अली बांगीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, विविध उपक्रमांचे समन्वयक प्रा. संतोष मराठे, महविद्यालयाच्या क्रिडा संचालिका प्रा. निधी भडवळकर, प्रा. नंदा जगताप, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. शंतनु कदम, प्रा. अनिकेत नांदिस्कर, प्रा. सिद्धी साळगावकर, प्रा. सुजित पवार, प्रा. दिपाली नागवेकर आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.