दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये क्रिडाक्षेत्राशी संबंधीत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये 22 फेब्रुवारी 2022 रोजी क्रीडा विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘ क्रिडाक्षेत्राशी संबंधीत प्रश्नमंजुषा स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी सर्वप्रथम स्पर्धेचे उद्धाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील महेक पठाण व साजिद पठाण या विद्यार्थ्यांनी ५५ गुणांसह प्रथम क्रमांक तर
ओवेस मुजावर व परीक्षीत पाखरे या विद्यार्थ्यांनी ५० गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. सदर स्पर्धेस निरीक्षक म्हणून प्रा. नंदा जगताप, श्री. सुजीत पवार यांची उपस्थिती होती.
तसेच स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा.वर्षा धामणे, प्रा. शंतनू कदम, प्रा. दिपाली नागवेकर, प्रा. प्रीती बोरजे आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री. महेश चव्हाण यांनी विशेष मेहेनत घेतली.