दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ रंगनाथन जयंती साजरी….
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ रंगनाथन जयंती साजरी
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दि 12/08/2023 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाविद्यालयाच्या मागासवर्गीय पुस्तक पेढी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या पुस्तक संचाचे वितरण प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे यांनी यावेळी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेऊन केवळ ग्रंथालयशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनीच नाही तर एकूणच शिक्षणाची आस्था असलेल्या सर्वांनीच डॉ. रंगनाथन यांच्या विषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, इतके मूलभूत आणि दूरगामी कार्य त्यांचे असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह डॉ. विक्रम मासाळ, डॉ. गंगा गोरे, प्रा. कैलास गांधी, डॉ. नंदा जगताप, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. सुजित टेमकर, प्रा. अनिरुद्ध सुतार आदी प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमकार पड्याळ याने मेहेनत घेतली.