दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयास नेवल NCC युनिटची मान्यता
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयास नेवल NCC युनिटची मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवणे सोपे झाले आहे.
रत्नागिरीच्या 2MAH Naval Unit NCC च्या अखत्यारीत एकूण 56 विद्यार्थ्यांचे युनिट महाविद्यालयास मिळाले आहे. सदर शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 20 विद्यार्थ्यांचे युनिट ( 10 मुले व 10 मुली) महाविद्यालयास मिळाले आहे. पुढील दोन वर्षात एकूण 36 विद्यार्थ्यांना NCC युनिट मध्ये प्रवेश मिळवता येणार आहे. वैयक्तिक आणि नेतृत्व करण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करण्याबरोबरच नौदल आणि खाजगी क्षेत्रातही काम करण्याच्या संधी ह्या विद्यार्थ्यांना एनसीसीमुळे सहज उपलब्ध होतील.
दापोलीमध्ये नेवल NCC युनिट मान्यता मिळवणारे दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज दुसरे महाविद्यालय ठरले आहॆ.
साधारपणे NCC मध्ये प्रवेश मिळवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाला विद्यार्थ्यांना विविध ncc camp मध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामध्ये सी ट्रेनिंग, ग्राऊंड ट्रेनिंग, ट्रेक यांचा समावेश असणार आहे.
गेले काही वर्ष हे एनसीसी युनिट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, क्रीडा संचालक प्रा. निधी भडवळकर यांचे दापोली शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांनी अभिनंदन केले आहे.