दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिना निमित्त दोन दिवसांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रा. अनिकेत नांदिस्कर यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याचा आणि विचारांचा मागोवा घेतला.
या निमित्त ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या तसेच काही विशेष ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र तसेच वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र या विषयांवरचे नव्याने दाखल झालेले ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते. त्याचबरोबर वेल्थ ऑफ इंडिया या भारतातील नैसर्गिक साधन संपत्ती विषयी शास्त्रीय माहिती देणाऱ्या ग्रंथाचे सर्व खंड विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले होते.
ग्रंथालय समिती प्रमुख डॉ. विक्रम मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल कीर्ती परचुरे आणि ग्रंथालय परिचर ओमकार पड्याळ यांनी प्रयत्न केले.