दापोलीअर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजला एल. आय. सी. समितीची भेट…..
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा पासून M.com, B.M.S. MSC in Microbiology हे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्या साठी दि. १८फेब्रुवारी २०२२ रोजी मुम्बई विद्यापीठ गठित समितीने दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजचे परिक्षण केले. या प्रसंगी परिक्षक म्हणून मुंबई विद्यापीठ समितीचे समन्वयक डॉ. जी.बी. सारंग, सदस्य डॉ. डि. पी. रावेरकर, डॉ. एस. डी. दिसले यांची उपस्थिती लाभली .