भारतीय संविधानाच्या प्रकट वाचनाने ‘वाचन सप्ताहास’ उत्साहात सुरुवात..
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मध्ये वाचन सप्ताह सुरू झालेला असून तरुणाईने व्हाट्सॲप, ट्विटर , फेसबुक इत्यादी पासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करावी हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वाचन सप्ताहाच्या प्रथम दिवशीच महाविद्याल याचे प्राचार्य डॉक्टर संदेश जगदाळे यांनी भारतीय संविधाना चे प्रकट वाचन केलं ‘ माणुसकी , कर्तव्यशिकवणारा आणि उत्तम नागरिक घडणारा हा ग्रंथ आहे , ‘ असेही ते या प्रसंगी म्हणाले. शासनपद्धती , संविधानसभा , संविधानाचे स्वरूप , नागरीसेवा , न्यायव्यवस्था , कायदे इत्यादी अनेक विषयांना या प्रकटवाचनात विद्यार्थी शिक्षकांसमोर मांडण्यात आले.
भारत शासनाच्या आदेशानंतर 2022 पर्यंत, ‘ रीडिंग मिशन 2022 ‘ हा उपक्रम राबवण्यात येणारआहे. त्यामुळे समृद्ध साहित्याची जोपासना आणि पुस्तक वाचण्याची सवय तरुणांना होईल यात शंका नाही.
