Dubssc मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली….
आज दिनांक ०२/०१/२०२१ रोजी दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात DLLE विभागा मार्फात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन केले.
त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा सांभाळणाऱ्या या रणरागीणी विषयी चार शब्द सांगितले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.