2020 राज्यस्तरीय परिसंवाद मध्ये विद्यार्थ्यांचे सुयश ….
वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड ता.दौंड जिल्हा पुणे येथे
राज्यस्तरीय परिसंवाद इमर्जिंग अँड इनोवेटिंग लाइफ सायन्स या विषयावर दिनांक 17 व 18 फेब्रुवारी
2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स
कॉलेज मधील पदवीव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभागातील कु. अरुंधती राणे व कु. मनाली देसाई या
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय परिसंवादांमध्ये एकूण 55 संशोधनपर निबंध सादर
करण्यात आले. या 55 सादरीकरणामधून मनाली देसाई या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात प्रथम क्रमांक
अरुंधती राणे या विद्यार्थिनीस तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश जगदाळे वनस्पतिशास्त्र विभाग
प्रमुख डॉ. रघुनाथ घालमे, डॉ. विक्रम मासाळ, प्रा. दिपाली दिवाण या शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. रघुनाथ घालमे यांनी स्वतः या परिसंवादांमध्ये शोधनिबंध प्रस्तुत
केला, ही एक कौतुकास्पद बाब ठरली असुन यशस्वी विद्यार्थिनींच्या यशावर महाविद्यालयाचे प्राचार्य,
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप कौतुक व्यक्त केले आहे.