‘ वेगळ्या दृष्टिकोनातूनच चित्रकार तयार होतो ‘- चित्रकार सुनील कुलकर्णी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये फाईन आर्ट्सची शाळा संपन्न.
दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये कला विभाग अंतर्गत ‘ ललितकलेची ( Fine Arts ) ‘ कार्यशाळा ११ व १३ जुलै रोजी घेण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून चित्रकार सुनील कुलकर्णी यांची उपस्थिती होती. निवडक 25 विद्यार्थ्यांना घेऊन सुनील कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणातच ऑनदस्पोर्ट पेंटिंग , फोटोग्राफी , कोलाज यांची प्रात्यक्षिके घेतली. या शाळेमधून मुलांना फाईन आर्टस संबंधित महत्व पूर्ण माहिती मिळाली जेणे करून येत्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये विद्यार्थीत्याचा उत्तम उपयोग करू शकतील.
या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. प्रिया करमरकर, प्रा. श्रुती आवळे या असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या अध्यक्षते खालीही कार्य शाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.