” योग ही एक जीवन पद्धती आहे, योग चित्तवृत्ती निरोधा : | “- योग शिक्षक श्री. शैलेश आठल्ये. दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस ‘ उत्साहातसंपन्न…
२०१४ साली भारताच्या शासनाने योगाशी संबंधित एक अभिनव प्रयोग केला, या प्रयोगास जगभरातील एकुण १९३ देशांनी होकार देऊन ‘ २१जुन ‘हा दिन ‘ आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.
हा योगा दिवस दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये एक ६५ विद्यार्थ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके दाखवुन व करवुन घेऊन उत्साहात साजरा झाला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना योगमार्गदर्शक म्हणून आयुष मंत्रालयाकडुन राष्ट्रीय योग शिक्षक म्हणून मान्यता प्राप्त सौ. हर्षदा डोंगरे आणि योग शिक्षक श्री. आठल्ये यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वत :च्या वैयक्तिक अनुभवांपासुन सुरुवात करत योगासनांमुळे त्यांच्या वर झालेल्या विविध चांगल्या परिणामांबाबत त्यांनी संवाद साधला. शरीरनिरोगी कसे ठेवावे , योगासनांचा अभ्यास , प्राणायामाचे परिणाम या विषयी हरिद्वार येथे झालेल्या योग शिबीराचे चित्तथरारक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ‘ आजची पिढी फार कमकुवत आहे. वय वर्ष ४०पर्यंत खुप पैसे कमवावे व नंतरतेच विविध उपचारां मध्ये गमवावे अथवा आजपासुन योग साधनाकरुन शेवट पर्यंत निरोगी आयुष्य जगावे हे दोनच पर्याय तरुण पिढी समोर आहेत , असे ही ते विद्यार्थ्यांनाउद्देशुन म्हणाले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सौ. हर्षदा डोंगरे यांनी प्राणायामातील बद्रिकाकपालभाती , अनुलोमविलोम , भ्रामरी अशा विविध प्रकारां बाबत माहिती दिली व शैलेश आठल्ये यांनी प्रात्यक्षिके त्याच वेळेस विद्यार्थ्यांकडुन करवुन घेतली. मयुरासन, कटीचक्रासन, सर्वांगासन, पद्मशीर्षासन असे विविध कठीण आसने प्रत्यक्ष करुन दाखवून शैलेश आठल्ये यांनी मुलांमध्ये योगासनांप्रती उत्सुकता निर्माण केली. या कार्यक्रमाची सांगता प्रा. संदेश जगदाळे यांच्या भाषणाने झाली. योग प्राणायाम ही जगाला भारताने दिलेली देणगी असुन महाविद्यालयाच्या महिलावसतीगृहावर सुद्धा योग प्रशिक्षण सत्र सुरु करण्याबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. आदित्य रिसबु डयाविद्यार्थ्याने केले आणि शेवटी महाविद्यालयाच्या क्रिडासंचालक सौ. वर्षा धामणे यांनी आपले आभार प्रदर्शित केले.