‘ पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचे दर्शन ‘ या विषयावर उद्बोधक राष्ट्रीयस्तरावरील वेबिनार संपन्न
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या वनस्पतीशास्त्रविभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीयस्तरावर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ‘पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचे दर्शन ‘ या विषयावर ऑनलाईन वेबिनार दि. १७ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत यशस्वीरित्या पार पडले.
याप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व IQAC समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे यांनी वेबिनारचे प्रास्ताविक व उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापकांचे स्वागत केले. तदनंतर कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे उद्धाटनीय भाषण झाले.
या राष्ट्रीयस्तरावरील वेबिनारचे समन्वयक प्रा. अजिंक्य मुलुख यांनी प्रमुख व्याख्याते – डॉ. विनोद शिंपले यांची उपस्थितांना ओळख करुन दिली.
सदर वेबिनारमध्ये व्याख्याते डॉ. विनोद शिंपले
यांनी भारताची जैवशास्त्र व पर्यावरणीय विविधता,भारतातील जैवविविधता धोक्यात असलेली ठिकाणे, वनस्पती संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांशी सखोल संवाद साधला आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना वनस्पती संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
याप्रसंगी या वेबिनारमध्ये आपला उत्सफुर्त सहभाग दर्शवित राष्ट्रीयस्तरावरुन एकुण १४९ शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. विक्रम मासाळ व प्रा. श्रुती आवळे यांनी ही आपले मोलाचे योगदान दिले.
दापोली एज्युकेशन सोसायटी नेहमीच अशा उपक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रोत्साहीत करीत असुन सदर राष्ट्रीयस्तरावरील वेबिनारच्या आयोजनासाठीही महाविद्यालयास संस्थेचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले.