दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये पं.जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात संपन्न…!
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फेअत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
या प्रसंगी डॉ. गंगा गोरे यांनी ओघवत्याशैलीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच प्रा. सुजीत टेमकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदाना विषयीची माहिती उपस्थितांना कथन केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.