दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमधील ग्रंथालयात ‘ डॉ. शियाली रामामृत रंगनाथन ‘ यांची जयंती उत्साहात साजरी…
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमधील ग्रंथालयात दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालयीन पद्द्धती आणि ग्रंथालयाशास्त्र यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या व्यक्तीमत्त्वातून तरुणाईस प्रेरणा मिळावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी माहिती मिळावी या हेतूने १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत ग्रंथालयविभागातर्फे ‘ ऑनलाईन प्रश्नमंजुषा ‘ आयोजित करण्यात आली.
यासाठी सहभागी विद्यार्थ्यांना डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची सखोल माहिती देणारी पुस्तिका ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आली आणि सहभागी विद्यार्थ्यांनी या पुस्तिकेचे वाचन करुन प्रश्नमंजुषा सोडवली.
याप्रसंगी महाविद्यालयामध्ये IQAC समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे यांनी ‘ डॉ. रंगनाथन ‘ यांच्या प्रतिमेचे पुजन केले. कॉलेजच्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे आणि प्रा. संतोष मराठे यांनी आपल्या मनोगतातुन डॉ. रंगनाथन यांच्या व्यापक ग्रंथालयीन कार्याची सखोल माहिती उपस्थितांना करुन दिली.
डॉ. रंगनाथ जयंतीच्या दिवशी ग्रंथालयात ग्रंथालय समिती प्रमुख डॉ. विक्रम मासाळ, डॉ. गंगा गोरे. डॉ. बापू यमगार , सुजित पवार, प्रकाश शिगवण, संजय गायकवाड , ऱोशन राऊत, श्रीमती रचना कदम यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.