दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये स्पर्धा परिक्षांवर आधारित ५०० हून अधिक उपयुक्त पुस्तकांचे प्रदर्शन
आजचे युग स्पर्धेचे असून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत व तपश्चर्येची आवश्यकता आहे. ग्रामीण विद्यार्थी हे अत्यंत हुशार असतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते मागे राहतात, त्यासाठी दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजने स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध करुन देऊन ग्रामीण तरुणांना प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या जागे पर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षांबाबत जागृती निर्माण व्हावी, या साठी महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षा केंद्र विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परिक्षांच्या अभ्यास क्रमावर आधारित ५०० हून अधिक उपयुक्त पुस्तकांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात
दिनांक११आणि १२ मार्च २०२२ रोजी सकाळी११ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल होते
या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. घन:श्याम साठेव आय.क्यु. ए.सी विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ घालमे, स्पर्धा परिक्षाकेंद्रसमन्वयक डॉ. बापू यमगर, ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुर, शिक्षक कर्चारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
सदर ग्रंथ प्रदर्शन दापोली तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यां साठी खुले करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ दापोलीतील वराडकर बेलोसे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही घेतला.
या ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे, ग्रंथालय सहाय्यक अनघा शिंपी, तसेच स्पर्धा परीक्षा केंद्र समिती सदस्य प्रा. शंतनू कदम, सुजित टेमकर व शिक्षकेतर कर्मचारी योगेश महाडिक यांनी विशेषमे हेनत घेतली.