दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये मनःशांती या विषयावर कार्यशाळा संपन्न.
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये मनःशांती या विषयावर मनःशांती केंद्र लोणावळा या
संस्थेतर्फे मनोहर पालकर यांची कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. सदर कार्यशाळा दोन सत्रांमध्ये पार
पडली असून प्रथम सत्राचा लाभ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी तर द्वितीय सत्राचा
लाभ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला. या कार्यशाळेत मनोहर पालकर यांनी मनाच्या
एकाग्रतेवरील विविध प्रयोग विद्यार्थ्यांकडुन करवुन घेतले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य संदेश
जगदाळे यांनी केला. तसेच कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. नंदा जगताप यांनी केले. महाविद्यालयातील
विद्यार्थी – शिक्षक कल्याण मंच यांच्यातर्फे आयोजित या कार्यशाळेमुळे मन , शरीर व श्वास यांच्या
योग्य संतुलन राखल्याने जीवनाचा प्रवास आनंदी व सर्वार्थाने सफल होतो , याची जाणीव प्रकर्षाने
झाली. कार्यशाळेच्या यशस्वीतेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सचिन वायंगणकर व संजय गायकवाड
यांचा सहभाग होता.