दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालया मध्ये ‘ आयक्युब देश भक्तीपर माहिती पटाचे सादरीकरण ‘
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी भौतिक शास्त्र विभाग आणि संगणकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ आयक्युब – इस्रोइंडियाइंटरस्टेलर ‘ या देशभक्तीपर माहितीपटाचे सादरी करण करण्यातआले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रम अध्यक्ष, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी सरस्वती पुजनाने केली.
त्यानंतर स्वराज्य महोत्सवाचे आयोजन समन्वयक प्रा. संतोष मराठे यांनी स्वराज्य महोत्सवातील विविध उपक्रमांचा धावता आढावा घेत देशाच्या जडणघडणीत मोलाच्या वाटाउचलणाऱ्या अनेक शास्त्रज्ञ, क्रांती कारकांना मानवंदना देण्याचा महाविद्यालयाचा हेतु या महोत्सवामुळे सुफल संपुर्ण झाला, या बाबत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेहेनतीचे कौतुक करत आपली कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिगंबर कुलकर्णी यांनीआपले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जेअब्दुल कलामयांच्या प्रेरणेतुन आयक्युब माहितीपटा द्वारे इस्रो मधीलअनेक भारतीय वैज्ञानिकांना आदरांजली देण्याचा विद्यार्थ्यांचा सुहेतुविशद केलाआणि विद्यार्थ्यांच्या मेहेनतीचे भरभरुन कौतुक ही केले.
आयक्युब – इस्रोइंडियाइंटरस्टेलर या माहिती पटामधुन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. विक्रम साराभाई , डॉ.होमी भाभा यांच्या अथक प्रयत्नांतुन स्थापन झालेल्याआणि जागतिक पातळीवर द्वितीय क्रमांकावरअसणाऱ्या इस्रोच्या रोमांचकारीवाटचालीची माहिती देण्यात आली.
या माहितीपटामध्ये इस्रोची विविध अभियानेजसेकी, चांद्रयान, मंगलयान तसेच PSLV, GSLV, SSLV अशा विविध रॉकेट्सची निर्मीती, इस्रोचे अंतराळ संशोधनातील तसेच भारताच्या अण्वस्त्र सुरक्षीतते मधील महत्त्वपुर्ण योगदानाबाबत उपस्थितांना सखोल माहिती देण्यातआली.
सदर माहिती पटातुन इस्रोपुढील आर्थिक अडचणी व इंडियाचे स्वतंत्र स्पेससॅटेलाईट सेंटर बनविण्यासाठीच्या नवीन उपक्रमांबाबत ची माहिती देत उपस्थित तरुण पिढीस वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात एक पाऊल अग्रेसर करण्याची प्रेरणा देण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोप्रसंगी प्राचार्य डॉ. संदेशज गदाळे यांनी अध्यक्षीय भाषणातुन ‘विद्यार्थ्यांनी आपला भारत देश बलाढ्य व प्रगत व्हावा यासाठी स्वत: संशोधन क्षेत्रात सक्रीय होण्याचे’,आवाहन केले.
सदर कार्यक्रमास आय. क्यु. ए. सीसमन्वयकडॉ. रघुनाथघालमे, अभ्यासेतरउपक्रमसमन्वयकडॉ. विक्रममासाळ, संगणकशास्त्रविभागप्रमुखप्रा. सदानंदडोंगरेतसेचबहुसंख्यविद्यार्थीआणिशिक्षक – शिक्षकेतरकर्मचारीउपस्थितहोते.
या प्रसंगीvकार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. विश्वेश जोशी यांनी केले असुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यश पवार तसेच भौतिकशास्त्र आणि संगणक शास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहेनत घेतली.