दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2019-2020 चा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेज चा रौप्यमहोत्सवी वर्षातील मुंबई विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा 25 मार्च रोजी दापोली येथील श्री. माधव कोकणे सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक त्यांची उपस्थिती लाभली. तसेच या समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष श्री. श्रीराम माजलेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य घन:श्याम साठे, समन्वयक दिगंबर कुलकर्णी तसेच कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या समारंभाची सुरुवात प्रमुख अतिथी डॉ. प्रसाद कर्णिक यांच्या हस्ते झालेल्या सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी मुख्य अतिथी व मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार केला. या ६ व्या मुंबई विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र सोहळ्यात 270 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रमुख अतिथी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक यांनी आपल्या बीजभाषणातून ‘ पदवी प्राप्त सर्व विद्यार्थ्यांनीभविष्यकाळात ही महाविद्यालयाशी आपले संबंध दृढ ठेवून, आपल्या अनुभवांचा उपयोग आजी विद्यार्थ्यांनाकरून द्यावा व सुजाण नागरिक होण्यासाठी प्रयत्नशील असावे ‘, असे प्रतिपादित केले.
तद्नंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. श्रीराम माजलेकर यांनी पूर्व स्मृतींना उजाळा देत महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीबद्दल कौतुक व्यक्त केले. या पदवी प्रदान समारंभात कॉलेज मधील तृतीय वर्ष विज्ञान व वाणिज्य शाखेतील तसेच पदव्युत्तर विज्ञान शाखेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी डॉ. प्रसाद कर्णिक यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी असे आवाहन केले की, ‘ सर्व पदवीप्रदान यशस्वी विद्यार्थ्यांनी ‘ माजी विद्यार्थी संघात ‘ प्रवेश घेऊन महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा आणि माजी विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या सर्व बदलांचा नक्कीच मागोवा घेण्यात येईल.’
तसेच तेजस मेहेता या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतातून महाविद्यालयाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना पुढील भविष्यात विविधक्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरण्यासाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुग्धा कर्वे यांनी केले असून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले मोलाचे योगदान दिले.
सदर हुसर्व कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील ‘ परीक्षा विभाग’ यांच्या तर्फे करण्यात आले होते.