*दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सुयश*
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम व कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे अण्णा शिरगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागातील द्वितीय वर्षामधील अनुष्का भोसले हिने तृतीय पारितोषिक संपादन केले आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा वराडकर महाविद्यालयात झाला. या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या राकेश भडंग यांच्याकडून बक्षीस वितरण झाले असून विजेत्या स्पर्धकांचे निबंध थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वेब पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, तसेच, वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा. ज्योती चौगले, प्रा. ऋजुता जोशी, प्रा. सिद्धी साळगांवकर, प्रा. ऋचा दळवी व प्रा. श्रद्धा खुपटे यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.