‘ दापोलीकरांच्या मदतीसाठी दापोली लाईफलाईन संघ पुन्हा सज्ज’ ५ वे प्रशिक्षण शिबीर पंचनदी येथे उत्साहात संपन्न…
दापोली येथील दापोली लाईफ लाईन ही सेवा भावी संस्था पुन्हा दापोलीकरांच्या मदतीसाठी सज्ज होत आहे.
एकुण २० निवडक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन या संघाचे ५ वे शिबीर पंचनदी येथील दुर्गम व डोंगराळ भागात १५ – १६ जुन रोजी पार पडले.
शिबीराच्या पहिल्या दिवशी २० लाइफलाईनर्सनी या वेळेस दोरीच्या सहाय्याने डोंगराचा कडा उतरणे आणि चढणे या ची प्रात्यक्षिके लिलया पार पाडली. तसेच अपघातग्रस्त व्यक्ती सहाताळणे व तपासणे तसेच स्ट्रेचर मध्ये ठेऊन वाहनापर्यंत नेणे या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सह्याद्री ट्रेकर्सच्या कुशल – अनुभवी कार्यकर्त्यांकडुन शिकल्या.
दुसऱ्या दिवशी पंचनदीच्या निसर्गरम्य परिसरात फक्त दोरीच्या सहाय्याने तिरके होऊन नदी ओलांडणे, खोल नदी तउतरणे, दोरखंडबांधण्याचे प्रकार आणि अखेरीस प्रथमोपचार देण्याचे प्रशिक्षण पार पडले.
सह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक श्री. संजय पारठे दोन्ही दिवस आपल्या सहाय्यकांसोबत उपस्थित होते. लाईफलाइनर्सनी कमी वेळात आत्मसात केलेल्या कौशल्या बद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले. तसेच या प्रसंगी दापोली लाइफलाई न चे समन्वयक श्री. अविनाश मयेकर , सुमंत जुवेकर, प्रसाद फाटक व दापोली शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. प्रसाद करमरकर यांनी लाईफ लाईनर्स सोबत सर्व प्रात्यक्षिके केली त्यामुळे त्यांची उपस्थिती खुपच उत्साह वर्धक ठरली.
दापोली लाईफ लाईन ही संस्था २०१८ मध्ये कोकण कृषी विद्यापिठाच्या बसलाझालेल्या अपघातानंतर स्थापित झाली असुन, अपघात , आग , नैसर्गिक आपत्ती अशा प्रसंगी आपद्ग्रस्तांना वेळेवर मदत करणारे सक्षम तरुण स्वयंसेवक विकसित करण्याचा; यासंस्थेचा उद्देश आहे. तरीही इच्छुक नागरिकांनी ही ०२३५८-२८३२५६ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन दापोली लाईफ लाईन आपत्ती व्यवस्थापन संघात सक्रीय सहभाग घ्यावा , असे आव्हान करण्यात येत आहे.