घटनात्मक भाषणाचे अभिवाचन प्रजासत्ताक दिनी संपन्न.
‘शिस्त म्हणजे संविधान’ हे सांगणाऱ्या भाषणाचे आणि सर्व नागरिकांचे जीवन नियंत्रित करणाऱ्या घटनेचे वाचन या वर्षीच्या २६ जानेवारी २०१९ च्या प्रजासत्ताक दिनी दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या सभागृहात पार पडले.
संविधानाचे महत्व पटवून देणे हा मुख्यतः अभिवाचनाचा हेतू होता. या अबिवाचनाचे नियोजन जयंत ग्रुप दापोली आणि दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या सयुंक्त प्रयत्नांनी झाली.
२५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९९ खाजदार व माननीय वाय्क्तींसमोर भारतीय राज्यघटना मांडताना जे भाषण केले होते त्याचे हे अभिवाचन होते. या भाषणाचे अभिवाचन प्रा. संतोष मराठे, कृणाल मंडलिक, प्रा. कैलास गान्धी, सुदेश मालवणकर हे मान्यवर वक्ती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाच्या अभिवाचनमुळे स्वतंत्र, समता या बंधुता हि तीनही तत्वे प्रत्येक नागरिकांचे जबाबदारीने सांभाळायला हवीत हे प्रकर्षाने उपस्तित प्रेक्षकांना जाणीवाले.
सर्व मान्यवर अभिववचनाचा सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी केला आणि अबिवाचनाचा कार्यक्रम यशस्वरीत्या पार पडला.