आविष्कार रिसर्च कन्व्हेंशनमध्ये दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स महाविद्यालयाची बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या २०२१- २२ या शैक्षणिक वर्षात दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी
मुंबई विद्यापीठ आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार रिसर्च कन्व्हेंशन २०२१-२२ मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये यावर्षी अंबर जोशी( वाणिज्य व्यवस्थापन व कायदा), सायली भालेकर (अभियांत्रिकी व तंत्रज्ञान), स्नेहा कासारे (औषधशास्त्र व निर्मिती) या विद्यार्थ्यांनी प्रा. दिपाली नागवेकर, प्रा. ज्योती चौगले, प्रा.अमृता मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम शोधनिबंधांचे प्रस्तुतीकरण केले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि आविष्कार रिसर्च कन्व्हेंशनचे महाविद्यालयातील समन्वयक डॉ. बापु यमगर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.