‘ सुंबरान ‘ पथनाट्यास उडान महोत्सवात प्रथम क्रमांक प्राप्त….
रत्नागिरी झोन अंतर्गत पाली येथील डी.जे. सामंत महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागा मार्फत 3 मार्च रोजी झालेल्या उड़ान महोत्सवामध्ये दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मधील विद्याथ्यांनी पथनाट्य स्पर्धेत बाजी मारली.
पथनाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुंबरान नावाचे सामाजिक व स्त्रियांच्या समस्येवर आधारित
पथनाट्याचे दर्जेदार सादरीकरण करुन प्रथम क्रमांक प्राप्त केला.
यामध्ये अमृता राणे, रोहित माने, हर्षल जैन, अरबाज मुल्ला, पूजा जालगांवकर, मोहिनी पालकर, वैभवी बागकर, नेहा देवकर प्रथमेश इंदुलकर, सुविधा मांजरेकर, अंकिता शिर्के, सूरज तांबे, स्वप्निल जोशी या प्रथम व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी दिग्दर्शक जयवंत काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याचे उत्तम सादरीकरण केले. या स्पर्धेचे परीक्षण ‘ गांव गाता गजाली ‘ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्यांनी केले असुन प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व संस्था सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना विस्तार विभाग प्रमुख प्रा. गंगा गोरे , प्रा. शंतनु कदम व या विभागातील इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.