सांस्कृतिक विभाग आयोजित बहर युवा महोत्सव ‘ Online binline’ संपन्न ..
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजने यंदाच्या शैक्षणिक वर्षात covid-19 च्या परिस्थितीवर मात देत संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने बहर युवा महोत्सव अत्यंत चिकाटीने व उत्साहात संपन्न केला.५ ते 12 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात नाट्य, संगीत, व्यंगचित्रकारी, वक्तृत्व इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनेच नाव नोंदणी करून थेट प्रक्षेपण, व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटोंच्या माध्यमाने आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. या युवा महोत्सवात कॉलेजमधील कॅप डे, मिसमॅच डे, नो व्हेहिकल डे, राष्ट्रीय युवा दिवस हे डेज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी कॉलेजने त्या प्रत्येक दिवसाचा विशेष महत्व सांगणारा, संदेश देणारा फोटो तयार केला आणि हा फोटो मुलांनी त्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर व स्टेटस ठेऊन आपले डेज आनंदाने साजरे केले.
तसेच याच कालावधीत सांस्कृतिक विभागातर्फे एक नृत्य कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती त्याच्या प्रमुख कलासक्त अकॅडमी स्थापित करणाऱ्या, भरतनाट्यम व ओरिसा नृत्यामध्ये विशारद असणाऱ्या रसिका गुमास्ते या होत्या. या महोत्सवाचा अंतिम टप्प्यात कॉलेजच्या सांस्कृतिक समितीने ऑनलाईन मुलाखती घेऊन महाविद्यालयासाठी यावर्षीचा ‘ आदर्श विद्यार्थी ‘ व ‘ आदर्श वाचकही’ निवडला. अशा प्रकारे हा युवा महोत्सव यथासांग पार पडावा यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा.प्रियांका साळवी, सर्व विद्यार्थी प्रमुख व इतर सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण काम केले.