‘ संविधानदिवस …..’ दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये उत्साहात संपन्न.
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकावचर्चा सत्रांनंतर मसुदासमितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा मसुदा स्विकारला. त्यामुळे हा दिवस
‘ संविधानदिन ‘ म्हणून साजरा केला जातो. दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे’ संविधानदिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे यांनी संविधान प्रतिज्ञा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यानंतर उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त करीत सुत्रसंचालक प्रा.सुजीत टेमकर यांनी भारतीय संविधानाचे देशाच्या जडणघडणीतील योगदान विशद केले व कार्यक्रमाची सांगता झाली.