‘ शारीरिक पोषण आणि बदलती जीवनशैली ‘ या विषयावर वेबिनार संपन्न…
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये दिनांक १९ जुलै २०२१ रोजी स. ११ ते दु. १२.३० या वेळेत
‘ शारीरिक पोषण आणि बदलती जीवनशैली ‘ या विषयावर ऑनलाइन गुगल मीट द्वारे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. नंदा जगताप यांनी बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे आहार तज्ञ म्हणून कार्यरत, वेबिनारच्या प्रमुख व्याख्याता प्रलोभना देवरुखकर यांची प्रास्ताविकातून उपस्थितांना ओळख करून दिली.
या वेबिनारमध्ये देवरुखकर यांनी समतोल आहार, अन्नातून प्राप्त होणारे पोषण, दैनंदिन जीवनातील अन्नग्रहणाच्या चुकीच्या सवयी, शारीरिक व्यायाम व सुदृढता या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
तसेच याप्रसंगी घरातील परसबागेत विविध झाडांची लागवड करुन नैसर्गिकरित्या आपण जेवण बनविण्यास उपयुक्त गोष्टी सहज मिळवु शकतो, असेही त्या म्हणाल्या.
या वेबिनारला 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवित उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. वेबिनारच्या शेवटच्या सत्रात कॉलेजमधील महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. ज्योती चौगुले यांनी आभार प्रदर्शित केले आणि व्याख्यानाची सांगता झाली. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी प्रा. सिद्धी साळगावकर यांनी तांत्रिक सहकार्य केले .