‘विज्ञान व वाणिज्य शाखेतील संशोधन’ या विषयावर व्याख्यान – डॉ.प्रसाद कर्णिक
दिनांक 23 मार्च 2021 रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी वर्षी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक त्यांनी ‘ विज्ञान व वाणिज्य शाखेतील संशोधन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संशोधनासाठी पुढाकार घ्यावा हा त्यामागील मुख्य हेतू होता.
‘ संशोधनामुळे मानवी जीवनशैलीत झालेला आमूलाग्र बदल आणि संशोधनाची नितांत गरज ‘
या व्याख्यानातून डॉ प्रसाद कर्णिक यांनी उपस्थितांना पटवून दिली आणि सखोल मार्गदर्शन केले.
या व्याख्यानाच्याची यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. बापु यमगार व सहाय्यक प्रा. शंतनू कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.